इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये फादर्स डे साजरा करा अन् बंपर बक्षिसे जिंका

Jun 16, 2025 - 13:46
Jun 16, 2025 - 16:34
 0  4
इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये फादर्स डे साजरा करा अन् बंपर बक्षिसे जिंका
इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये फादर्स डे साजरा करा अन् बंपर बक्षिसे जिंका

मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशीने वडिलांसाठी खास फादर्स डे सेलिब्रेशन, धमाल खरेदी आणि आकर्षक बक्षिसांसह यंदा खास सरप्राईज तयार केले आहे. ‘फादर्स डे’ आणि ‘एंड ऑफ सीझन सेल’च्या निमित्ताने, मॉलमध्ये १५ जूनपासून खास उपक्रम आणि ऑफर्स सुरू होणार आहेत.

१५ जून, रविवार रोजी 'द रेमंड शॉप' आणि 'एथनिक्सच्या बाय रेमंड' यांच्या सहकार्याने खास कॅरिकेचर अ‍ॅक्टिव्हिटीचं आयोजन करण्यात आले आहे. वडिलांसोबत या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि तुमच्या नात्याचं रेखाचित्राच्या माध्यमातून अनोखं स्मरण बनवा. ही कृती फादर्स डे अधिक खास बनवणारी आहे.

इनऑर्बिट मॉलमधील अनेक नामांकित ब्रँड्सवर सध्या 'एंड ऑफ सीझन सेल' सुरू आहे. ग्राहकांना ५०% पर्यंत सूट मिळणार आहे. ही खरेदीप्रेमींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. २३ जूनपासून 'शॉपिंग करा अन् जिंका' या धमाल कॅम्पेनला सुरुवात होणार आहे. २००० किंवा त्याहून अधिक खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खात्रीशीर गिफ्ट व्हाउचर्स मिळणार आहेत. याशिवाय, मॉलच्या मध्यवर्ती अ‍ॅट्रियममध्ये संपूर्ण आठवडाभर रंगतदार आणि सहभागी करता येतील अशा अ‍ॅक्टिव्हिटीज होणार आहेत, ज्या सर्व वयोगटासाठी खुल्या असतील.

खरेदी केल्यावर मिळणाऱ्या खात्रीशीर गिफ्ट्सशिवाय, दर आठवड्याला लकी विजेत्यांची घोषणा केली जाणार असून त्यांना ट्रॅव्हल ब्लू, प्लम, कुकी मॅन, थर्ड वेव्ह कॅफे सारख्या ब्रँडकडून रोमांचक बक्षिसे देऊन घोषित केले जाईल. एका भाग्यवान खरेदीदाराला बंपर बक्षीस घरी नेण्याची संधी आहे. आणि ते बक्षिस म्हणजे २.३० लाख किमतीची जावा ४२एक्स सिंगल एबीएस अलॉय बाइक मिळेल.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये आनंदी, उत्साही आणि कुटुंबवत्सल वातावरण अनुभवायला मिळणार आहे. खरेदी, सेलिब्रेशन, खेळ, गिफ्ट्स आणि खास फादर्स डे हे सर्व काही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल. त्यामुळे या खरेदीची संधी  न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0